झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचा दहावीचा शुभचिंतन व आशीर्वाद समारंभ उत्साहात संपन्न
प्रतिनिधी / झरे
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे येथील इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्ष 2024 - 25 चा वार्षिक निरोप समारंभाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर होते.
यावेळी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर, जीवनदीप विद्यामंदिर कामथचे शिक्षक अंकुश बरकडे सर, आटपाडी तालुका आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करावे व आपल्या शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. या विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता मागील काही वर्षांपासून अतिशय चांगली राहिली आहे. तीच परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांवर आहे. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तेव्हा सर्वांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावेे.
इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास एल ई डी प्रोजेक्टर भेट दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक संतोष वाघमारे सर यांनी केले तर आभार हिंदूराव वाघमोडे सर यांनी मानले. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, सचिव भीमाशंकर स्वामी सर, जीवनदीप विद्यामंदिर कामथचे शिक्षक अंकुश बरकडे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर, बिरू घोरपडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या