पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस मध्ये शिवजयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी / सांगली
दि. १८ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मदरसा हजरत अली बिन अबी तालिब रजि.पलूस संस्थेच्या डॉ.झाकिर हुसैन हायस्कूल पलुस मध्ये निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रशालेच्या 7 वी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा लहान व मोठा गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची प्रेरणा जागृत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
स्पर्धेचे आयोजन मदरसा हजरत अली बिन अबी तालीब पलूस शिक्षण संस्था व प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. "शिवाजी महाराजांचे संघटक", "शिवचरित्र", आणि "शिवरायांचे शौर्य आणि प्रशासन" यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनीं निबंध लेखन केले.
स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेचा निकाल शिवजयंती (१९ फेब्रुवारी) रोजी जाहीर केला जाणार असून विजेत्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे नाजिम मुफ्ती रफअत अली साहब यांनी केले होते. सदर स्पर्धा घेण्यासाठी आसिफ शेख सर व फिरोज पटेल सर यांनी विशेष परिश्रम घेतले यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या