झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाची श्रावण महिन्यातील वनभोजन सहल उत्साहात पार पडली.

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0


झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाची श्रावण महिन्यातील वनभोजन सहल उत्साहात पार पडली.  

दिनांक : ८ ऑगस्ट, शुक्रवार




झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे यांच्यावतीने आज शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यानिमित्त वनभोजन सहलीचे आयोजन करण्यात आले. ही सहल कुरुंदवाडी येथील निसर्गरम्य वातावरणात वसलेले प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री. बिरोबा देवस्थान येथे पार पडली. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहलीचा भरभरून आनंद घेतला.




सहल खासकरून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. श्री. बिरोबा देवस्थानच्या पाठीमागील छोटीशी डोंगर टेकडी सर करत विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगचा थरारक अनुभव घेतला. नैसर्गिक सौंदर्य, पवित्र मंदिर परिसर आणि एकत्र येण्याचा आनंद यामुळे सहलीस एक विशेष स्वरूप प्राप्त झाले.




सहलीदरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर यांनी विशेष भेट देत श्री. बिरोबा चे आगमन आरेवाडी हून पिंपरी च्या काळ्या खिंडीतून झाले आहे. येथे चैत्र महिन्यात मोठी यात्रा तीन दिवस भरते. बिरोबा देवस्थान चा इतिहास व परंपरा सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गामध्ये उत्साह संचारला. त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार, निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्व पटवून देत सहलीचे महत्व सांगितले.




सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही शाळेपासून ते बिरोबा मंदिरापर्यंत शिस्तबद्धतेचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. एकूणच ही सहल केवळ एक सहल न राहता, विद्यार्थ्यांच्या अनुभवसंपन्नतेचा एक अविस्मरणीय क्षण ठरला. या सहलीचे नियोजन श्री. प्रविण पारसे सर सहल विभाग प्रमुख यांनी केले होते. बर्‍याच विद्यार्थ्यांनीही गाणी, विनोदी गोष्टी सांगितल्या. नृत्य करुन दाखविले. सहलीच्या समारोपप्रसंगी प्रा. साहेबराव चवरे सरांनी बिरोबा देवस्थानचा प्रसाद म्हणून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना केळी देण्यात आली.




 या सहली दरम्यान संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, व्हा. चेअरमन श्री. भालचंद्र मेटकरी साहेब, श्री. देवानंद घोणते सर मुख्याध्यापक, श्री. रमेश सादिगले सर ज्येष्ठ शिक्षक, श्री. बिरु घोरपडे सर ज्येष्ठ शिक्षक, श्री. संतोष वाघमारे सर, श्री. हिंदुराव वाघमोडे सर, श्री. प्रविण पारसे सर, श्री. दादासाहेब बनगर सर, श्री. भास्करराव चौधरी सर, श्री. महेंद्र यादव सर, सौ. स्वाती सरगर मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी ऊपस्थीत होते. सर्व विद्यार्थ्यांनी श्री. बिरोबा देवस्थान मंदिर परिसराची स्वच्छता केली. अशा रीतीने श्रावण महिन्यातील छोटीशी सहल सुखरुप परतली.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*