*पलूस मदरसा डॉ.झाकिर हुसेन हायस्कुल पलूस मध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
पलूस | २६ जानेवारी २०२६
पलूस येथील मदरसा हजरत अली बिन अबी तालिब संस्थेच्या डॉ.झाकिर हुसेन हायस्कुल पलूस मध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व गौरवपूर्ण वातावरणात पार पडला. झेंडावंदन हाजी रियाज मगदूम किर्लोस्करवाडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे सचिव मीर रफअत साहेब यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या मार्गदर्शक भाषणात त्यांनी भारतीय संविधान, कायदे कसे तयार झाले तसेच २६ जानेवारी — प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला.यावेळी गफूर मुल्ला,मुनीर शेख ,जहाँगीर मुल्ला, हे मान्यवर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी आरीफ लतीफ यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध कवायत (ड्रिल) सादर केली. क्रीडा शिक्षक बाबासो नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व शिस्तबद्ध धाडसी मानवी मनोऱ्याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फूड फेस्टीवल चे आयोजन करण्यात आले होते. फूड फेस्टीवल चे उद्घाटन डॉ.शकीला पटेल यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील, डॉ.अख्तरहुसेन पटेल ,उद्योजक इसाक शेख,पत्रकार इकबाल मुल्ला हे आवर्जून उपस्थित होते. फूड फेस्टिव्हल नियोजनामध्ये प्रशालेचे शिक्षक समीर आगा यांनी खास परिश्रम घेतले.तदनंतर सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींनी व पालकांनी खुमासदार व थंड पेयांची चव चाखली व सहभागी मुलांचे कौतुक केले.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख यांनी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवित फूड फेस्टिव्हलमधून जमा झालेली रक्कम गरजू व गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा केली. या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
मुख्याध्यापक आलिम शेख सर यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या