झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

न्यूज प्रारंभ
By -
0


 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या प्रतिमेला पुष्पहार करताना उपस्थित मान्यवर.


झरे/ प्रतिनिधी 


जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे या विद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर, जानुबाई विद्यालय विरळीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. के. माने सर, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक डी.पी. माने सर, जीवनदीप विद्यामंदिर कामथचे अंकुश बरकडे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका डांगे मॅडम, सेवानिवृत्त फौजी देविदास यादव, प्रशालेचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर, बिरू घोरपडे सर, संतोष वाघमारे सर, हिंदुराव वाघमोडे सर, प्रवीण पारसे सर, दादासाहेब बनगर सर, महेंद्र यादव सर, भास्कर चौधरी सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी सागर पाटोळे, शिवाजी हेगडे व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शाल, श्रीफळ व फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचे आई-वडील हे पहिले गुरू होते. चांगल्या शिक्षणातून शिक्षणाचा पाया रचला जातो आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे असे ते म्हणाले.


जानुबाई विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. के. माने सर यावेळी बोलताना म्हणाले की, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बुद्धीचातुर्यामुळे व त्यांच्याकडे असलेल्या अंगभूत शिक्षकी गुणामुळे त्यांना या देशाचे सर्वोच्च स्थान मिळाले होते .  बुद्धिमान व ज्ञानी माणसांना समाजामध्ये खूप मूल्य दिलं जातं. शिक्षणाच्या आड गरिबी येत नाही. विद्यार्थ्यावर चांगले संस्कार असले पाहिजेत त्यासोबत गुणवत्ताही असली पाहिजे.  यावेळी बोलताना त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व इतर महापुरुषांच्या जीवन चरित्राच्या पुस्तकांसाठी  देणगी जाहीर केली.


यानंतर सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक बोलताना डी.पी. माने सर म्हणाले की, राधाकृष्णन यांचा भारतामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वर्चस्व होतेच. परंतु परदेशांमध्ये ही त्यांनी आपली छाप उमटवली होती आणि भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तसेच जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले होते.


संस्थेचे सचिव स्वामी सर म्हणाले की, विद्यार्थी व शिक्षक नाते हे मित्र प्रमाणे असावे. ते सूर्यासारखे स्वच्छ मन असणारे असावे. या देशांमध्ये पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षकी पेशाचा असलेला सन्मान आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्ने खूप मोठी पाहिली पाहिजेत. उच्च विचार व साधी राहणी असली पाहिजे.  या महापुरुषांच्या अंगीकार करून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष वाघमारे सर यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*