झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 'तारे जमीन पर' कार्यक्रमाचे आयोजन.

न्यूज प्रारंभ
By -
0


झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 'तारे जमीन पर' कार्यक्रमाचे आयोजन.



झरे / प्रतिनिधी 

 पोलाद स्टील कंपनी जालना शाखेच्या वतीने तारे जमीन पर हा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावा या उद्देशाने पोलाद स्टील कंपनीचे प्राध्यापक किशोर गोते व प्राध्यापक तानाजी चौगुले यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अवकाशातील गृह तारे झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात अवतरल्या सारखा भास तारांगण पाहताना झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आकाशातील  ग्रह तारे यांची माहिती सखोल घेतली. सरासरी वीस मिनिटे चालणारा हा कार्यक्रम पाहून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य पसरले होते. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


तारांगण म्हणजे एक अशी जागा किंवा थिएटर जिथे रात्रीच्या आकाशाचे, ग्रह, तारे आणि इतर खगोलीय वस्तूंचे आकर्षक आणि वास्तववादी दर्शन घडवले जाते. गोलाकार घुमटाच्या आतल्या बाजूला विशेष प्रोजेक्टरच्या मदतीने हे दृश्य प्रक्षेपित केले जाते, ज्यामुळे प्रेक्षकांना असे वाटते की ते खऱ्या अंतराळात प्रवास करत आहेत.


 आधुनिक तारांगणांमध्ये डिजिटल प्रोजेक्टर वापरले जातात, ज्यामुळे अधिक स्पष्ट आणि आकर्षक दृश्ये दाखवता येतात.

तारांगणामध्ये केवळ तारेच नव्हे, तर सूर्य, चंद्र, ग्रह आणि त्यांच्या गतीबद्दलची माहिती दिली जाते. यावेळी अनेक ठिकाणी 3D आणि स्पेशल इफेक्ट्स वापरून विद्यार्थ्यांना अधिक रोमांचक अनुभव दिला.


 तारांगणे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि विज्ञान शिकण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम आहेत. येथे अवघड संकल्पना सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितल्या जातात.


यावेळी बोलताना पोलाद स्टील कंपनीचे किशोर गोते व तानाजी चौगुले काय म्हणाले ते आता आपण पाहू..


💥 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 'तारे जमीन पर' कार्यक्रमाचे आयोजन.

🟨 पोलाद स्टील कंपनी जालना शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन 


https://youtu.be/cxpAPp35Hhs?si=wWlP40P_cBYYN2VP


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*