साहित्य आणि काष्ट शिल्पकला यामध्ये रमलेला अवलिया रमेश जावीर
न्यूज प्रारंभ स्पेशल रिपोर्ट
प्रतिनिधी /आटपाडी
स्त्री पुरुष नैसर्गिक स्वरूपातील काष्ठ शिल्पे शोधणे सुसंस्कारित करणे ही प्रतिभावान कल्पकतेला वाव असणारे कला कौशल्य छंद म्हणून जपणारे रमेश जावीर एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणावे लागेल. वेडी माणसे इतिहास घडवितात शहाणी माणसे इतिहास वाचतात. हा इतिहास शाळा महाविद्यालयातून शिकविण्याचे काम शिक्षक करतात. रमेश जावीर हे पेशाने शिक्षक. त्यामुळे ज्ञानदान करायचे काम केलेच, पण शिकविलेले आचरणात आणणे ही कौशल्याचे आणि प्रतिभेची बाब असते.
रमेश जावीर यांनी साहित्य लेखन ही केले. त्यांनी अवांतर वाचन म्हणून साहित्यकला संस्कृती अभिनय कला साधना केली. हे मला जमेल का, का नाही जमणार, जमलेच पाहिजे असे स्वतःच स्वतःशी विचारत राहिले. डोंगरदरी, नद्या नाले ,पर्वत शिखरे, मंदिर, मूर्ती काम, शिल्पकाम, रंगकाम, चित्रकारिता इत्यादी कला अवगत करण्यासाठी सतत फिरत राहिले भटकत राहिले. आणि येताना रिकाम्या हाताने आले नाहीत. अनेक पुस्तकांचा संग्रह केला. अनेक ठिकाणचे फोटो काढले. ते संग्रहित केले कलेची साधने प्रेमाने जपली. आणि फावल्या वेळात कला कौशल्य करून पाहिली.
नोकरीत मिळालेले वेतन कुटुंब बरोबर या कला कौशल्य निर्मितीत गुंतवत राहिले. मुलांनाही पदवीपर्यंत शिक्षण देत राहिले. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. जागा खरेदी पासून संग्रहालय निर्मितीच्या खर्चाच्या बाबी स्वतःच निभावल्या. त्यांनी कोणालाही आर्थिक मदत मागितली नाही आणि जरी मागितली तरी अद्याप कोणीही आर्थिक मदत त्यांना दिली नाही.
आज खरसुंडी या श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्याने आठ गुंठे परिसरात घररुपी संग्रहालय उभारले आहे. काही लोक दूरवरून हे संग्रहालय पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत, तर जवळचे काही लोक त्यांना बोलून ही सदिच्छा भेट देत नाहीत. ही त्यांची मनोमन खंत आहे.
रमेश जावीर यांना साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वि. वा. शिरवाडकर इत्यादींच्या नावाने पुरस्कारही मिळाले आहेत. सन्मान सत्कार झाले आहेत. फोटोग्राफी, पक्षी निरीक्षण, साहित्य लेखन, जुनी नाणी संग्रह. इत्यादी कौशल्ये आत्मसात केली आहेत. मानवी स्त्री पुरुष यांचे हे काष्ट शिल्प फोटो विविध रूपात दाखवले आहेत. मानवाचे रूप शब्दात मांडणे तसे फार सोपे.
पण लाकडासारख्या निर्जीव आणि नैसर्गिक स्वरूपात शोधणे ही कल्पकतेची बाब आहे. सोबतच्या काष्ट शिल्पामध्ये आंघोळीला बसलेली स्त्री, कानात कर्णफुले घातलेली स्त्री, सिंधू संस्कृती स्त्री , पावसाची वाट पाहणारी स्त्री, सामान्य माणूस, आदिमानव पुरुष, लटपटणारी स्त्री, इत्यादी काष्ट शिल्पे मधून मानवी भाव व्यक्त होताना दिसतात. दगड पाषाणांमध्ये काही शिल्पकार भाव व्यक्त करताना दिसतात. अशी शिळा शिल्पे मूर्ती काम मंदिरातून गुहा मधून पाहायला मिळतात.
काष्ट शिल्पकला ही अत्यंत दुर्मिळ कला असून ही कला आदिवासी भागात लोक जीवन चरित्रासाठी जपतात. अशा काही वस्तू तयार करून शहरात नेऊन विकतात. ठाणे, गडचिरोली, नंदुरबार भागातील आदिवासी लोकांकडेही कला अल्प प्रमाणात दिसून येते. उत्तर प्रदेश राजस्थान मध्येही या कलेचा विकास झालेला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये विलास नगरकर, बाबा कोकेवार, राहुल लोंढे, दीपक चिकणे, रमेश घोणते, रमेश जावीर, अशोक जाधव इत्यादींची नावे नैसर्गिक काष्ट शिल्प निर्मितीसाठी घ्यावी लागतील.
महाराष्ट्र शासनाने अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहन द्यावे. त्यांना संग्रहालय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन राखीव भूक्षेत्र वनीकरण क्षेत्र, डोंगरदर्याचे पडीक भूक्षेत्र उपलब्ध करून द्यावे. त्यांना इमारत निर्मितीसाठी अनुदान द्यावे असे रमेश जावीर यांना मनोमन वाटते. संग्रहालय मग ते शासकीय असो अथवा व्यक्तिगत खाजगी असो. ती देशाची संपत्ती आहे. संग्रहालय देशाचा अभिमान असतो. हा अभिमान, त्याचा स्वाभिमान, संस्कृती, भारत देशाने आज पर्यंत जपला आहे. यापुढेही जपावा ही मनोमन भावना आहे. देशाभिमान, राष्ट्रभक्ती, राष्ट्र शक्ती ही कलाकाराच्या नसानसात भिणलेली असते.
रमेश जावीर यांचे हे काष्ट शिल्प निर्मितीचे योगदान खूप मोठे आहे .या अर्थाने की त्यांच्याकडे शंभरहून अधिक विविध पक्षांचे आकार उपलब्ध आहेत तर 25 हून अधिक प्राण्यांची का ष्ट शिल्पे यामध्ये कुत्रा, वाघ, सिंह ,धावणारा सिंह. सांबर तोंड, गोमुख, हत्ती, डायनोसॉर इत्यादी कलाकृती ही संग्रहालयात पाहावयास मिळतात .त्यांचे आजवरचे होलिया काव्यसंग्रह 1993 , वाजाप कथासंग्रह, 1997 ,सप्तरंगी कला ललित लेख संग्रह 2000 ,गुलामीजीन कथासंग्रह 2022 ई बुक, कॉल दांडा सामाजिक काव्यसंग्रह 2022 ई बुक ,सुधीरास बालकाव्यसंग्रह 2023 ई बुक, परिवर्तनाचा नंदादीप सामाजिक काव्यसंग्रह 2022 ,ही बुक कर्मवीर स्तुतिकाव्य सुमने संपादित काव्यसंग्रह 2025 ,असे त्यांची साहित्यिक वाटचाल आहे .
रमेश जावीर यांनी सन 2007 मध्ये रमेश जावीर साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ खरसुंडी रजिस्टर संस्था स्थापन केली आहे .तिचा उपक्रम म्हणून जावीर काष्ठ शिल्पचित्र संग्रहालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली नावाने राहत्या घरामध्ये संग्रहालय उभारले आहे. या संग्रहालयात पाच दालने उपलब्ध आहेत. आज रोजी महाराष्ट्रात दीडशे एक संग्रहालय राहत्या घरामध्ये उभारली आहेत. अशा लोकांची पुरातत्व विभागाने माहिती संकलित केली आहे .फॉर्म भरून घेतले आहेत. तथापि त्यांना नोंदणी पत्र अद्याप दिलेली नाहीत .अनुदानाच्या योजनाही नियोजित केल्या नाहीत. ही चिंतनाची बाब आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळे म्हणून विशेष नोंद झाली तथापि महाराष्ट्र शासनाने अशा संग्रहाकांची संग्रहालयाची ही दखल घ्यावी असे रमेश जावीर यांना मनोमन वाटते.
माणसाला दोन डोळ्यांनी दिसते. तथापि कलाकाराला हा कला निर्मितीचा तिसरा डोळा विशेष उपलब्ध असतो. ही तिसरी बाजू शासनाने कला संचालनालय याने विशेष बाब म्हणून विकास करणे त्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे .शासनाच्या योजना खूप चांगल्या असतात परंतु या योजना राबविताना लेखनिक ,अधिकारी वर्ग याची दखल घेतांना दिसून येत नाही .कलाकार हा कलाकार असतो .तो एक अवलिया असतो त्याला फायदा तोट्याचा विचार नसतो लाखात एखादा असतो. याचे भान कला रसिकांनी ठेवले पाहिजे .त्याची विचारपूस केली पाहिजे. त्याच्या अडचणीत जाणून घेतल्या पाहिजेत. व्यसनापासून दूर असणाऱ्या आणि मनापासून कलानिर्मिती करत असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे हे जनमानसाचे काम आहे .शासनकर्त्यांचे काम आहे .
रमेश जावीर तसेच जन्मतः अपंग निराधार असणारी व्यक्ती असं असतानाही त्यांनी हा कलेचा डोलारा स्वयंस्फूर्तीने उभारला आहे. संशोधकांनी त्यांच्यावर अभ्यास करणे गरजेचे वाटते.
रमेश जावीर यांच्या या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत ..














टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या