तालुकास्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये कुमारी जोया शेख तालुक्यात प्रथम.

न्यूज प्रारंभ
By -
0

 

तालुकास्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये कुमारी जोया शेख तालुक्यात प्रथम.



प्रतिनिधी / जत


धावडवाडी एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी विद्यालयातील विद्यार्थिनी कु. जोया अल्फाज शेख हिने उंच उडीमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी राजे रामराव महाविद्यालय, जत येथे झालेल्या तालुका स्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये तिने घवघवीत यश संपादन केले आहे. 


यासाठी अथक परिश्रम घेणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बुद्धास सुर्वे सर, अष्टपैलू क्रीडा शिक्षक अजहर शेख सर तसेच सर्व शिक्षक -शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे विद्यार्थीनीचे व विद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*