'गरबा' नृत्यामुळे विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण

न्यूज प्रारंभ
By -
0


 'गरबा' नृत्यामुळे विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण; झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 'गरबा' नृत्य अतिशय उत्साही वातावरणात संपन्न.


झरे / प्रतिनिधी



जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,  झरे संचलित झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे. तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्री उत्सवानिमित्त विद्यालयात गरबा नृत्य तथा दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या नृत्यांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही 'गरबा' नृत्य खेळण्याचा मनोमन आनंद लुटला. 



यावेळी अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यालयांमध्ये अतिशय चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाची युट्युब लिंक खालील ठिकाणी अपलोड केली आहे., याची सर्वांनी नोंद घ्यावी .


यूट्युब लिंक.. लिंकवर दाबून धरा..👇

https://youtu.be/84wXqsYdq84


शाळेत गरबा नृत्य आयोजित करणे,  हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. गरबा नृत्य एक अतिशय आनंददायक आणि उत्साही नृत्य आहे, जे विशेषतः नवरात्री सारख्या सणांदरम्यान केले जाते.


🟨 शाळेत गरबा नृत्याचे फायदे..


शाळेत गरबा नृत्य आयोजित करण्याचे अनेक फायदे आहेत:


 * सांस्कृतिक शिक्षण: विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकण्याची संधी मिळते.


 * शारीरिक क्रिया: हे एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो.


 * सामुदायिक बांधणी: सर्व विद्यार्थी एकत्र येऊन नृत्य करतात, ज्यामुळे त्यांच्यात एकजूट आणि सहकार्याची भावना वाढते.


 * मौज-मस्ती आणि उत्साह: हे शाळेच्या वातावरणात आनंद आणि सकारात्मकता आणते.


तुम्ही शाळेत नवरात्री उत्सव किंवा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या प्रसंगी गरबा नृत्याचे आयोजन करू शकता.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*