सेट परीक्षा उत्तीर्ण आकाश चवरे यांचा झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीने सत्कार संपन्न.

न्यूज प्रारंभ
By -
0

 

सेट परीक्षा उत्तीर्ण आकाश चवरे यांचा झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीने सत्कार संपन्न.



झरे/प्रतिनिधी 


जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे येथे आज सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 कुरुंदवाडी येथील आकाश मारुती चवरे यांचा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर व यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर , ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर, रमेश सादिगले सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.



चवरे यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 



आकाश मारुती चवरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांनी (MSC) केमिस्ट्री विषयात उत्तीर्ण केली आहे. MH-SET परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची चवरे यांनी आतापर्यंत जे.ई.ई. आणि नेट परीक्षेमध्ये 1000 च्यावर उत्तीर्ण करून दाखविले आहेत. सध्या ते पी.एच.डी. करत आहेत. तसेच कोचिंग क्लासेसमध्ये तासिका तत्वावर काम सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*