झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाला सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय चॅम्पियनशिप प्राप्त

न्यूज प्रारंभ
By -
0


 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाला सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय चॅम्पियनशिप प्राप्त


तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यालयाची दमदार व रेकॉर्डब्रेक कामगिरी. 




सांगली : आटपाडी तालुक्यातील झरे येथील जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने तालुकास्तरीय मैदानी क्रीडा व सांघिक स्पर्धेत दमदार व रेकॉर्ड कामगिरी केली आहे. विद्यालयाला  सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय चॅम्पियनशिप मिळाली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी विद्यालयात आयोजित करण्यात आला. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, सचिव भीमाशंकर स्वामी सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर, रमेश सादिगले सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


या बातमीची यूट्युब लिंक 🔗 👇लिंकवर दाबून धरा

https://youtu.be/mmkeVXSJk20




दिनांक 2 व 3 सप्टेंबर रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख हायस्कुल बनपुरी तडवळे मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने खो-खो स्पर्धेत  घवघवीत यश संपादन केले.  त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. 14 वर्षे वयोगट मुले द्वितीय क्रमांक, 14 वर्षे वयोगट मुली तृतीय क्रमांक पटकावला आहे.


 1 ऑक्टोबर 2025 रोजी श्री. भवानी विद्यालय, आटपाडी या ठिकाणी संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 14 वर्षे वयोगट मुलींमध्ये श्रद्धा अमोल जुगदर 400 मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, मानसी सर्जेराव चव्हाण 200 मीटर धावणे द्वितीय क्रमांक,  14 वर्षे वयोगट मुले हर्षद जयेश मेटकरी 400 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, किरण चंद्रकांत गडळे लांब उडी द्वितीय क्रमांक, किरण चंद्रकांत गडळे 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांची जिल्ह्यासाठी निवड झाली आहे. 


17 वर्ष वयोगट मुले अनिस यासीन शिकलगार लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक,  17 वर्षे वयोगट मुली आश्लेषा अंकुश डोंबाळे 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक, श्रेया दादासाहेब जुगदर 400 मीटर धावणे द्वितीय क्रमांक,  मयुरी राजाराम गावडे 800 मीटर धावणे प्रथम क्रमांक,  वैष्णवी संतोष पवार 800 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, ऋतुजा शहाजी गावडे 1500 मीटर धावणे द्वितीय क्रमांक,  अक्षदा दाजीराम पारेकर लांब उडी मध्ये तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांची जिल्ह्यासाठी निवड झाली आहे. 17 वर्षे वयोगटाखालील मुले आर्यन आबा बरकडे 1500 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. 


19 वर्ष मुली मेघना बाळू चव्हाण हिने 1500 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत जिल्ह्यासाठी निवड झाली आहे. चैत्राली संभाजी बाबर 1500 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. 17 वर्षे वयोगट मुलींमध्ये  100 मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे. 17 वर्षे वयोगटातील मुलांनी सुद्धा 100 मीटर रिलेमध्ये द्वितीय क्रमांक, 14 वर्षे वयोगट मुले  100 मीटर रिलेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे .


तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेत विद्यालयाने एकूण 19 नंबर मिळवले आहेत. या सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष  भालचंद्र मेटकरी साहेब, सचिव भीमाशंकर  स्वामी सर, तसेच सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक बिरू घोरपडे सर, महेंद्र यादव सर व भास्कर चौधरी सर या सर्वांचे अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*