भोजलिंग ट्रेकर्स गृपचा स्तुत्य उपक्रम. सुट्टीच्या दिवशी केला भोजलिंग देवस्थान परिसर स्वच्छ.
झरे/प्रतिनिधी
श्री. प्रविण पारसे सर
आज रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी पहाटे 6 च्या सुमारास भोजलिंग देवस्थान परिसराची भोजलिंग ट्रेकर्स गृपने स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये देवाच्या गाभाऱ्यासमोरील तसेच आजूबाजूला पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, पाणी बाॅटल्स, नारळाची कवचे व केरकचरा जाळून नाहीसा करण्यात आला. तसेच परिसरातील झाडांची आळी करून गवत व इतर निरुपयोगी वनस्पती काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे परिसराला विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले.
माण तालुक्यातील भोजलिंग डोंगरावर झरे, पारेकरवाडी, विभूतवाडी, काळचौंडी, जांभूळणी, दिघंची, शेनवडी, बनगरवाडी, विरकरवाडी, पुळकोटी, शिरताव व म्हसवड परिसरातील नागरिक ट्रेकींगसाठी दररोज येत असतात. यामध्ये डाॅक्टर, शिक्षक, वकील तसेच अनेक व्यावसायिकांचा समावेश असतो. सुमारे अडिज ते तीन किलोमीटर अंतराचा असलेला डोंगर चढताना ट्रेकर्सची चांगलीच दमछाक होत असते. डोंगरावर येऊन हे ट्रेकर्स व्यायाम आणि योगासने करून विसर्जित होत असतात.
अध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला श्रावण महिना लवकरच सुरू होत असल्याने आपल्याही हातून परिसर स्वच्छ करून देवाची सेवा घडावी असा मानस काही ज्येष्ठ ट्रेकर्सनी व्यक्त केला. त्याला प्रतिसाद देत आज रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे डोंगर परिसरातील सर्वांनी व आलेल्या भाविकांनी भोजलिंग ट्रेकर्स गृपचे कौतुक केले आहे.
आजच्या स्वच्छता मोहिमेत माणदेशी फाउंडेशनचे विजय सिन्हा, आय. आर. एस. सचिन मोटे साहेब, माजी सैनिक जावीर बापू, सिद्धनाथ येवले, धनाजी आटपाडकर, राजाराम तोरणे, बापूसाहेब वाघमारे, जोतीराम सोळसे, विठ्ठल डोंबाळे, विष्णू तांबवे, प्रविण पारसे, भरत कदम, विजय पवार, सचिन सासणे, कृष्णदेव ढेरे ,सुंदरदास पैठणे, आनंदराव जमाले, सचिन विरकर, सचिन यादव, स्टार ट्रॅव्हल्सचे दिलीप शेठ वीरकर, प्रदीप तावरे, सुनील थोरात, संजय जगताप, अमर जगताप, विठ्ठल काळेल, सचिन विरकर, योगेश तावरे, सचिन यादव, अजित पिसे यांसह अनेक ट्रेकर्स सहभागी झाले होते.
निरोगी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी व्यायाम हा एक अविभाज्य भाग आहे. नियमित व्यायामामुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते. व्यायामामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात, ज्यामुळे दीर्घायुष्य आणि एक ऊर्जावान जीवन जगण्यास मदत होते. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने पहाटे ट्रेकींगला यावे असे आवाहन माणदेशी फाउंडेशनचे विजय सिन्हा, आय. आर. एस. सचिन मोटे साहेब , माजी सैनिक जावीर बापू तसेच सर्व ट्रेकर्सनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या