'शैक्षणिक क्रांती' पुरस्काराने प्रा. साहेबराव चवरे सन्मानित
झरे / प्रतिनिधी
कला, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'दैनिक वाळवा क्रांती' 2025 चा 'शैक्षणिक क्रांती' पुरस्कार जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे यांना नुकताच 'दैनिक वाळवा क्रांती'चे संपादक गजानन शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
'शैक्षणिक क्रांती' पुरस्काराने गौरविण्यात आल्याने आज बुधवार दिनांक 16 जुलै रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीने प्रा. साहेबराव चवरे यांचा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, " ज्या विद्यार्थ्याला शिक्षणाची कोणतीही गोडी नव्हती, जो विद्यार्थी शाळेत येताना टाळाटाळ करत होता. तोच विद्यार्थी पुढे जाऊन जागृती वाचनालय व झरे पंचक्रोशी जनता विद्यालय सारखे शैक्षणिक संकुल उभा करू शकतो. आणि हीच शैक्षणिक क्रांती समजून वाळवा क्रांतीचे संपादक गजानन शेळके यांनी हा पुरस्कार दिलेला असावा असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांना याआधीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 'आदर्श माता- पिता पुरस्कार' हाही पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा पुरस्कार आहे. शिक्षणातून शहाणपण घ्या, मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना फसवू नये किंवा त्यांनी फसू नये इतपत शिक्षण घेतलं पाहिजे असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजही पालावरची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे. यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न सुरू आहे. शिक्षणाच्या आड गरिबी येत नाही. यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. यावेळी त्यांनी आयआयटीचे शिक्षण घेणाऱ्या आप्पा माळवे या विद्यार्थ्यांचा दाखला दिला. शेतकरी कुटुंबामध्ये राहून सुद्धा आयआयटी सारखी अभियंता पदवी प्राप्त करण्यासाठी तो गुवाहाटी या ठिकाणी शिक्षण घेत आहे असे ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या