अकलूज-सांगली एसटी बसचे झरेत उत्साहात स्वागत.

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 अकलूज-सांगली एसटी बसचे झरेत उत्साहात स्वागत.

श्री. प्रविण पारसे, सर 



सांगली: आटपाडी तालुक्यातील झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय येथे अकलूज सांगली एसटी बसचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी चालक आकाश उडसंगे (यवतमाळ) व वाहक गणेश माळवे (पळशी ता. माण) यांचा सन्मान करण्यात आला.

 



विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर, रमेश सादिगले सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सरगर शेठ, जयेश मेटकरी व प्रवासी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार करण्यात आला.



 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या गेट जवळ गाडी थांबवून श्रीफळ वाढवून गाडीचे पूजन करण्यात आले. यावेळी वाहक व चालकांचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब , सचिव भीमाशंकर स्वामी सर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या व प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.




अकलूज - सांगली एसटी बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अकलूजवरून ही गाडी सकाळी 7 वा. सुटते. झरे येथे सकाळी 9 वा. येते. माळशिरस, म्हसवड, वरकुटे मलवडी, झरे, भिवघाट, तासगाव मार्गे सांगली. तसेच सांगलीतून दुपारी 12.30 वा. सुटते. सांगली , सातारा व सोलापूर जिल्ह्यांना जोडणारी ही बस असल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*