राज्यातील शिक्षकांना टप्पा वाढ अनुदान मिळत नाही म्हणून महिला शिक्षकांचा आझाद मैदान मुंबई येथे आत्मदहनाचा प्रयत्न.
थेट आझाद मैदान मुंबई तुन
न्यूज प्रारंभ वृत्तसेवा
दिनांक 5 मार्च 2023 पासून राज्यातील अंशतः अनुदानित, विनाअनुदानित त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा व मूल्यांकनास पात्र असलेल्या शाळांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानावर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत आहेत.
आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी दुपारी तीन च्या सुमारास महिला शिक्षकांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत आपल्या मागण्या शासनामुळे मांडून देखील शासन आपल्या मागण्या पूर्ण करत नाहीत म्हणून त्यांचा राग अनावर झाला आणि दोन महिला शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून स्वतःला जाणून घेण्याचा आत्मदहण्याचा प्रयत्न केला, ही बातमी कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना कळताच त्यांनी तात्काळ अधिवेशन सोडून घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी झालेल्या सर्व प्रकारची माहिती घेतली असता त्यांनी आझाद मैदान शेजारी असलेले आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे त्या महिलांना पोलिसांनी अटक केली होती तेथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची भेट घेऊन आंदोलन करत या शिक्षकांवर कोणताच गुन्हा दाखल करू नका, अशी माननीय पोलिसांची समजूत काढली, कोणताही गुन्हा दाखल होऊ दिला नाही, राज्यातील शिक्षकांनी संयम ठेवावा आपल्याला टप्पा वाढ नक्कीच मिळणार त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, आपला प्रयत्न व लढा असाच सुरू राहणार आहे, परंतु अशा मार्गाने कोणीही आपल्या जीवाचं बरं वाईट न करता किंवा आत्मदहन वगैरे न करता शांततेने आपल्या मागण्या आपण मांडत राहूया सरकार निश्चितच आपल्या मागण्या पूर्ण करेल परंतु कोणत्याही शिक्षकाने चुकीचं पाऊल उचलू नका असे मार्गदर्शक केले तसेच आझाद मैदानावर जाऊन सुद्धा शिक्षकांची भेट घेतली*
आज कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना भेटून उद्याची बैठक घ्यायला लावणार, व आपला प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे
खंडेराव जगदाळे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या