झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा स्मृतिदिन साजरा
न्यूज प्रारंभ वृत्तसेवा
आटपाडी/प्रतिनिधी
झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. झरे गावचे लोकनियुक्त सरपंच अंकुशराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, सचिव भीमाशंकर स्वामी सर, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच महादेव खंदारे, मधुकर खंदारे, कांतेश्वर घोरपडे, ॲड. विजय वाघमारे, बाळू माने, संतोष मेटकरी, आटपाडी तालुका आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे, नितीन वाघमारे, आनंदराव यादव, गिताबाई यादव, मंगल कुलकर्णी, संजय थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, क्रांतिवीर नागनाथ अण्णा यांनी अतिशय त्यागमय जीवन व्यतीत केले. आण्णांचे जीवन राजकारणविरहित राजकारणापलिकडे असल्याने यामध्ये अनेक पक्षातील कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते. त्यांच्या त्यागमय भूमिकेमुळे दुष्काळी आटपाडीसह 13 तालुक्यांचे नंदनवन झाले. क्रांतीवीर पद्मभूषण डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी आटपाडी तालुक्यात आल्याने अशक्य असलेले पाणी तालुक्यात पोहोचू शकले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वाघमारे सर यांनी केले तर आभार हिंदूराव वाघमोडे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या