नवनियुक्त पी.एस.आय. राहुल पाटील यांचा सत्कार संपन्न

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 

नवनियुक्त पी.एस.आय. राहुल पाटील यांचा सत्कार संपन्न


न्यूज प्रारंभ वृत्तसेवा



प्रतिनिधी / आटपाडी

श्री. प्रविण पारसे सर


 झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात विभूतवाडीचे सुपुत्र राहुल दत्तू पाटील यांचा पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, सचिव भीमाशंकर स्वामी सर, प्रशालेचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक यांच्या वतीने सत्कार संपन्न करण्यात आला. यावेळी विभूतवाडीचे लोकनियुक्त सरपंच सुरज तानाजी पाटील, उपसरपंच जालिंदर लक्ष्मण पावणे, निलेश दत्तू पाटील, गणेश विठ्ठल पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, राहुल पाटील यांनी स्वतःच्या हिमतीने अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये पाच सहा वर्षे घालवलेले आहेत. अनेकदा अपयश आले तरी खचून न जाता त्याने यश हाशील होईपर्यंत प्रयत्न केला.  पुढची परीक्षा  डेप्युटी कलेक्टर दर्जाची आहे. मनात तीव्र जिद्द बाळगून जी माणसं काम करतात, त्यापैकी हा एक राहुल आहे.


कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले.  रयत शिक्षण संस्थेचा वारसा त्याला तिथं लाभलेला आहे. आपली  मुले मुली सुद्धा ऑफिसर होऊ शकतात.  तुमच्यापैकी उद्या भविष्यातले असे सत्कार करण्याचा योग आम्हाला मिळावा अशी अपेक्षा प्रा. साहेबराव चवरे सर यांनी व्यक्त केली. आजची सत्कारमूर्ती ही काही काय वेगळी नाही. या मातीतला माणूस आहे आणि या मातीतल्या माणसाने यश संपादन केलेले आहे. आम्हीही सुद्धा यश संपादन करू शकतो. त्यात काही अडचण येत नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्याला गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. तसं तुम्हाला अधिकारी व्हायला वशिला वगैरे लागत नाही हे यांनी सिद्ध केलंय.


संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर म्हणाले की, आयुष्यात पैसा येतो आणि जातो. पण माणसाने नम्रता, निष्कलंक चारित्र्य, निर्व्यसनी असले पाहिजे. ही प्रशाला सामाजिक वसा आणि वारसा घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यातुन प्रेरणा घेऊन भविष्यात मोठ्या स्थानी विराजमान झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. 


यावेळी सत्काराला उत्तर देताना राहुल पाटील म्हणाले की, झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने माझा सत्कार केल्याने मी भारावून गेलो आहे. यामुळे मला भविष्यात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. माझ्या या यशामध्ये माझे आईवडील, सर्व गुरुजनांचे भक्कम आशिर्वाद आणि प्रेरणा मिळाली आहे.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे सर यांनी केले तर आभार हिंदूराव वाघमोडे सर यांनी मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*