कृष्णा आली अंगणी, आनंदली झाडे वेली

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 

कृष्णा आली अंगणी, आनंदली झाडे वेली.


झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या प्रांगणातील झाडांना कृष्णेचे पाणी


वृत्तांकन - श्री. प्रविण पारसे सर



न्यूज प्रारंभ वृत्तसेवा 


आटपाडी : झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी विद्यालयाच्या प्रांगणातील सर्व वृक्ष वेली कृष्णेच्या पाण्याने तृप्त झाल्या. गेल्या काही दिवसांपासून टेंभू जलयुक्त शिवार योजनेचे पाणी झरे व झरे परिसरात आले आहे. याच संधीचा फायदा घेऊन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या मदतीने झाडांना पाणी घालण्याचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला.



आज शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी विद्यालयाच्या दिशेने अनेक कळश्या , बादल्या वगैरे भांडी घेऊन विद्यार्थी विद्यालयाच्या दिशेने येत होते. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचे वातावरण निर्माण झाले होते. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने मागील आठवड्यात झरे गावच्या हद्दीत प्रवेश केला. झरे व झरे परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या आनंदाने टेंभूच्या पाण्याचे स्वागत केले. ऐन दुष्काळात या पाण्याचा उपयोग परिसरातील गावांना होणार आहे. आधीच दुष्काळाच्या झळा बसलेल्या भागात पाणी आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

झरे पंचक्रोशी जनता विद्यालयातील महेंद्र यादव सर, प्रविण पारसे सर , भास्कर चौधरी सर, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. अंदाजे पाच हजार लिटर पाणी झाडांना मिळाले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच श्रमप्रतिष्ठेचे मूल्य या माध्यमातून रुजवले गेले. यामुळे विद्यार्थ्यांना शारिरीक कष्टाची सुद्धा सवय असावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. 


बातमीची लिंक 🔗 खाली देत आहे. ही लिंक यूट्युबवर पेस्ट करून सर्च करा. किंवा खालील लिंकवर जागेवर दाबून धरा.यूट्यूबचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .

https://youtu.be/P2L5axSF9Hk




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*