पुनावळेत 1990 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
पुणे/प्रतिनिधी
न्यूज प्रारंभ वृत्तसेवा
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील जीवन शिक्षण विद्यामंदिर पुनावळे , या शाळेतील सन 1990 च्या इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अलका बबन केंजळे मॅडम यांनी भूषविले. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री महादेव रामचंद्र गोळे गुरुजी, सौ मीनाक्षी महादेव गोळे व पिंपरी चिंचवड मनपा पुनावळे शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ ज्योतीताई संजय तापकीर मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संयोजन इयत्ता सातवी ची 1990 ची संपूर्ण बॅच यांनी केले. या सर्व विखुरलेल्या पक्षांना पुन्हा एकदा घरट्यात आणण्याचे काम खऱ्या अर्थाने अनिल बांधल, संतोष राऊत किरण सोमनाथ, विजय विनायक अमजद, व बाळू ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून साकार झाले.
खऱ्या अर्थाने हे श्रेय अनिल बांदल यांना जाते. ज्यांनी दोन वर्ष सतत पाठपुरावा करत सर्वांना एकत्र जोडण्याचे व संपर्क साधण्याचे काम केले. तसेच सर्व मुलींना एकत्र करण्याचे श्रेय वैशाली भुमकर ला जाते.
दिनांक एक जून 2025 रोजी चा दिवस निश्चित झाला. सदर कार्यक्रमादरम्यान या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र वर्गात बसण्याचा व डबे खाण्याचा, तसेच मैदानात खेळण्याचा आनंद पुन्हा एकदा लुटला. छान गप्पा सुखदुःखांची विचारपूस, वर्तमानाची चर्चा व भविष्यातील स्वप्न विषयावर छान गप्पा मारल्या.
संतोष राऊत सर यांच्या नियोजनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी रुतुजा राऊत व प्रगती नाईकवाडे यांनी, सुत्रसंचालन करत पाहुण्यांचे व सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी स्वागत गीत गायले. व शेवटी माननीय संतोष राऊत सरांनी आभार व्यक्त करत या कार्यक्रमाची सांगता व समारोप केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या