ज्ञानेश्वर बोंबले विज्ञान प्रदर्शनात राज्यात द्वितीय

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

श्री.मानसिंगभाऊ पवार कनिष्ठ महाविद्यालय ढोरकीन चा सागर ज्ञानेश्वर बोंबले विज्ञान प्रदर्शनात राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला

मुंबई / प्रतिनिधी 



केंद्रशासन व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग तसेच NCERT नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.मानसिंगभाऊ पवार कनिष्ठ महाविद्यालय ढोरकीन ता.पैठण येथील चि.सागर ज्ञानेश्वर बोंबले याने राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्याची महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनात नॅशनल स्तरावर निवड झाली आहे. विज्ञान प्रदर्शनात आपत्ती व्यवस्थापन आणि दळणवळण विषयावर आधारित मल्टी फंक्शन ड्रोण तयार करून सादरीकरण केले होते. त्याच्या यशाचे खरे शिल्पकार मार्गदर्शक शिक्षक प्रा.महेश रघुनाथ कुलकर्णी सर यांचे या कामात खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले.


 सागर च्या या प्रयोगाचे मॉडेल चे पेटंट प्रा.महेश कुलकर्णी सर लवकरच त्याच्या नावे करणार आहेत. सागर च्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सारुक सर, प्राचार्या श्रीमती आशा नारळे ( गोरे ) मॅडम, व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, माध्यमिक विभागाच्या मुख्य शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना सर, जिल्हाधिकारी श्री.दिलीप स्वामी साहेब, गट शिक्षणाधिकारी श्रीराम केदार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अनिल पुदाट साहेब, छ्त्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.पद्माकरराव मुळे साहेब, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य श्री.डोंगरे सर, प्राचार्य पॉलिटेक्निक कॉलेज चे श्री.डिकले सर, ड्रोण लॅब चे इन्चार्ज श्री.लहाने सर, विज्ञान परीक्षक श्री.सुकुमार नवले सर, श्री.दिलीप शिरसाठ सर  केंद्रप्रमुख श्री.संतोष पवार सर, पंचायत समिती पैठण चे विषय तज्ञ श्री.बाळकृष्ण मुळे सर आदींनी भर भरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*