झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 'बालिका दिन' उत्साहात साजरा
झरे /प्रतिनिधी
३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. सन २०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त त्यांचे 'गुगलडुडल' प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादनही केले होते.
आज मंगळवार दि. 3 जानेवारी 2023 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे 'बालिका दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल विटाचे सहाय्यक शिक्षक मोहन पिसाळ व अंकुश पंडित यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, सचिव भीमाशंकर स्वामी, मुख्याध्यापक देवानंद घोणते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रा. साहेबराव चवरे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन मुलींना कसे शिकवले, यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या