1 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा बाबत शासन निर्णय आवश्यक - खंडेराव जगदाळे Khanderao Jagdale
न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया
3 तारखेपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे - महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांचे आवाहन. आंदोलनाला याल तर यश मिळेल नाहीतर नक्कीच फसाल. 3 जानेवारी 2024 पासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार आहे. लढा आपल्यासाठी व आपल्या कुटूंबासाठी आहे. असे आवाहन त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना केले आहे.
शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवूक करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. यावेळी मात्र सर्वांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मागील आंदोलनात मी दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन आपल्याला शब्दांच्या खेळात अडकवून फसवण्याची शक्यता आहे हे आझाद मैदानात ठणकावून सांगितले होते. असे प्रतिपादन खंडेराव जगदाळे यांनी केले आहे.
असे असले तरी त्यावेळेस स्वतः शिक्षणमंत्री दीपक केसरकर मैदानावर आले व त्यांनी स्वतः जबाबदारी घेतल्याने शिक्षकांनी त्या दिवशी रात्री उशिरा निघालेल्या पत्रावर समाधान मानून आंदोलन मागे घेतले. मात्र नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात अंशतः अनुदानित शाळांसाठी वाढीव टप्प्यासाठी डिसेंबर २०२४ लागेल असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते.
ही फसवणूक असून याला जबाबदार आंदोलन करणारे कुणी नसून घरी बसणारे आपण लोक आहात.तेंव्हा त्यावेळी झाली ती चूक झाली,पण यावेळी कुणीच घरी राहू नका. असे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 2024 हे वर्ष विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे आहे.
निवडणूक तोंडावर आल्यावर कोणतेच सरकार समाजातील कोणत्याच घटकाला नाराज करत नसते आणि निवडणूक झाल्यावर पुढील ४वर्षे कुणालाच गांभीर्याने घेत नसते,हा आपल्या लोकशाहीचा इतिहास आहे.
यामुळेच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका किंबहुना आचारसहिंता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन १ जानेवारी २०२४ पासून वाढीव टप्पा व इतर सर्व मागण्या बाबत शासन निर्णय होणे आवश्यक आहे.
यावेळी एक गणित सांगितले की, प्रत्येक शाळेतील किमान २ शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी असे तीन जण जरी आले तरी १२०००-१५००० लोक जमू शकतात.आणि म्हणूनच राज्यातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षक यांना या पोस्ट द्वारे मी आवाहन करत आहे की बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ पासून सर्वांनी आझाद मैदान, मुंबई गाठावे. अनुदान मिळाले तर आत्ताच मिळणार नाहीतर परत केवळ पश्चाताप करत बसावा लागेल.आपण सर्व सुज्ञ आहात,निश्चितच स्व -हित लक्षात घेऊन घर सोडाल अशी आशा आहे. असे मत खंडेराव जगदाळे यांनी व्यक्त केले आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या