शिक्षक समन्वय संघाने घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट, मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन
न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया
शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज मंगळवार दि. 19 डिसेंबर 2023 रोजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली. आज नागपूर येथे विधान भवनात समन्वय संघाने भेट घेतली असून टप्पावाढ बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
शिक्षणमंत्र्यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर दिलेल्या आश्वासनानुसार 1 जानेवारी 2024 पासूनच पुढील टप्पा वाढ देण्यात यावी. अशी भूमिका समन्वय संघाने ठामपणे मांडली. यावर शिक्षणमंत्र्यांनी मुंबई येथे बैठक लावू असे आश्वासन दिले आहे.
परंतु आता गोलगोल उत्तर नको आहे अशी स्पष्ट भूमिका समन्वय संघाने घेतली आहे. यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.
पुढील नियोजनाबाबत लवकरच शिक्षक समन्वय संघ सर्वानुमते निर्णय घेईल असे शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक बाळकृष्ण गावंडे यांनी न्यूज प्रारंभ डिजीटल मिडियाशी बोलताना सांगितले.
यावेळी दीपक कुलकर्णी, ज्ञानेश चव्हाण, संगीताताई शिंदे, संतोष वाघ, ज्ञानेश्वर शेळके, बाळकृष्ण गावंडे, मनीष गावंडे, गिरीश मखमले, उमेश साखरे, अंकुश शेंडोकार, सचिनजी तोत्रे, रविकांत जोजारे, पंजाबराव बडगे, प्रवीण लोंढे, शिवाजी खुळे, जाहेद पटेल सह आदी समन्वयक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या