राज्यातील सर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खूशखबर
न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची विधानसभेत तर शंभुराज देसाई साहेब यांची जुन्या पेन्शनबाबत विधानपरिषदेत घोषणा; वित्त विभागाची मान्यता; लवकरच शासननिर्णय निर्गमित होणार
नागपूर दि. 14 डिसेंबर 2023
राज्यातील सर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित पदांवर व तुकड्यावर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशनचा सुटला असून वित्त विभागाने सहमती दर्शवली आहे.याबाबतचा अधिकृत शासननिर्णय लवकरच निर्गमित होणार आहे.
जुन्या पेंशनबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभेत तर शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत जुनी पेंशन योजना लागू केल्याची अधिकृत घोषणा आज केली.
महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला असून याचा लाभ राज्यातील 26000 कर्मचारी बांधवांना होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभेत घोषित केले.
जुन्या पेंशनची अधिकृत घोषणा केल्याबाबत सौ. संगीताताई शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर साहेब, राज्यातील सर्व माजी व कार्यरत असणारे आमदार साहेबांचे आभार मानले.राज्यातील 26000 कुटुंबाना न्याय देण्याच्या कामात जिवन सार्थकी लागल्याचे व परिश्रमाचे फळ मिळाल्याची भावना यावेळी सौ. संगीताताई शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन कोअर कमिटीची संपूर्ण टिम व राज्यभरातील 26 हजार शिक्षक बांधवांना शुभेच्छा देऊन अभिनंदनही केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या