मंगळसूत्र चोरी प्रकरणातील आरोपींना पकडून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
प्रतिनिधी /झरे
मौजे झरे येथे बुधवार दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी झरे ते खरसुंडी मार्गावर झरे पंचकोशी जनता विद्यालयाच्या मैदानाच्या बाहेरील उत्तरेकडील रस्त्यावर दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे गंठण हिसडा मारून पळवुन नेले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच झरे पंचकोशी जनता विद्यालय, झरे, ता . आटपाडी या विद्यालयातील शिक्षकांनी शेनवडी, काळचौंडी, पारेकरवाडी, खरसुंडी, पिंपरी बु. तरसवाडी, कलेढोण, विखळे या परिसरातील पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना फोन करून सर्वांना सतर्क केले. त्यामुळे हे सराईत चोर पकडण्यास मदत झाली होती. त्यामुळे या शिक्षकांचा सुध्दा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्री. साहेबराव चवरे सर व सचिव भीमाशंकर स्वामी सर यांनी अभिनंदन केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेची तात्काळ दखल घेत विटा उपविभागाच्या 'निर्भया पथकातील' पो.ह. उदय साळूंखे, पो. ना. पांडूरंग मोहिते, पो.कॉ. निलेश माळी, महिला पो. कॉ. भारती भाट यांच्या कामगिरीने सदर महिलेच्या गळयातील दागिने परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. याबद्दल 'जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था' झरे या संस्थेच्यावतीने पत्र लिहून सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
आता या घटनेचा पंचनामा पूर्ण झाला आहे. अधिक तपास आटपाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव हे करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या