झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
झरे/प्रतिनिधी
झरे येथील जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला कर्मवीरांच्या विचारांचे वारसदार तथा संस्थेचे अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 'कमवा आणि शिका' या योजनेमुळेच मी शिकू शकलो. बहुजनांच्या मुलांना उच्चशिक्षित करण्याचा जणू विडाच कर्मवीर आण्णांनी उचलला होता. त्यामुळेच त्यांनी तन मन धनाने शिक्षणाची गंगा खेडोपाडी पसरवली.
यावेळी बोलताना सचिव भीमाशंकर स्वामी म्हणाले की, एका दलित वर्गातील गरीब मुलास आपल्या राहत्या घरी आश्रय देऊन कर्मवीर अण्णांनी ज्ञानदानाची गंगोत्री सुरु केली. आज या गंगोत्रीचा नेत्रदीपक विस्तार होऊन तिला महासागराचे रुप आले आहे.
यावेळी संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या