महाराष्ट्र सर्व क्षेत्रांत अग्रेसर - प्रा. साहेबराव चवरे सर यांचे प्रतिपादन
झरे /प्रतिनिधी
प्रविण पारसे
महाराष्ट्र राज्याने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, औद्योगिक, सांस्कृतिक, राजकीय, अध्यात्मिक, चित्रपट, संगीत, साहित्यिक, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन 'जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था' , झरेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर यांनी केले.
आज सोमवार दि. 1 मे 2023 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे. येथे 'महाराष्ट्र दिन' व 'कामगार दिन' साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 1 मे 1960 रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार 'महाराष्ट्र राज्याची' स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. अतिशय चारित्र्यसंपन्न व निष्कलंक व्यक्तीमत्वाचा प्रा. साहेबराव चवरे सर यांनी उहापोह केला.
संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर म्हणाले की, 'झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे. हे राज्यातील आदर्श उदाहरण आहे. डोंगर, वाडी व वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक अहोरात्र मेहनत घेत आहेत. शिक्षकांच्या उत्तुंग गुणवत्तेबद्दल त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेचा पहिला विद्यार्थी कोणतेही डोनेशन न देता एम. डी. झाला याचा मला खूप आनंद होतोय असे ते म्हणाले.
यावेळी शैक्षणिक वर्ष 2022-23 चा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. इयत्ता नववी मध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित शिक्षक बिरू घोरपडे सर यांनी बक्षीस दिले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आयुष आण्णा कोळेकर(230 गूण) व आर्यन प्रेमदत्त धूम (176 गूण) या दोन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे सर यांनी केले. तर आभार हिंदूराव वाघमोडे सर यांनी मानले.
दरम्यान संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी यांच्या स्नुषा सौ. महानंदा स्वामी यांना 'आदर्श मुख्याध्यापिका' पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या