नियमबाह्य शाळांवर एकाच वेळी कारवाई का नाही? बोगस शाळा संचालकांना शिक्षण विभागाचेच अभय
नागपूर : जिल्ह्यातील बोगस बेकायदेशीर शाळांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे; परंतु बोगस शाळा सुरू असताना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाने आजवर कठोर कारवाई का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिक्षण समितीची भूमिका संशयास्पद असून बैठकीत नुसती चर्चा केली जाते. प्रत्यक्षात सभापती वा सदस्यांनी अशा बोगस शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन वस्तुस्थिती सभागृहात मांडलेली नाही.
जिल्ह्यात बोगस शाळांची संख्या १२ असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यातील पाच शाळांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरांवर अशीच कारवाई का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस शाळांचा संचालक व शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत या विषयावर वादळी चर्चा झाली. सर्व बोगस शाळांवर फौजदारी कारवाईचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. मात्र, मोजक्याच बोगस शाळा संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या