- कुंडलच्या डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयाचा अनोखा उपक्रम
![]() |
ऊसतोड मजूरांना त्यांच्या झोपडीत जाऊन मिष्टान्न देताना शिक्षक व विद्यार्थी |
भूक लागली असताना खाणे याला प्रकृती म्हणतात,भूक लागली नसताना खाणे याला विकृती म्हणतात तर स्वतः ला भूक लागली असताना त्यातील एक घास दुसऱ्याला देणे याला संस्कृती म्हणतात. खऱ्या अर्थाने आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे.शाळा या विद्यादान करणारी पवित्र मंदिरे असून यात केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामजिक जाणिव विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवून त्यांना घडवणे ही आपणा शिक्षकांची जबाबदारी आहे. केवळ उपदेश न देता ते कृतीत आणण्यासाठी आमचे डॉ.पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय,कुंडल नेहमीच अग्रेसर असते.
मग ते दुष्काळी टापूतील जनावरांना चारा वाटप असेल,वनराई बंधारा बांधणे असेल,वृद्धाश्रमात जाऊन मदत असो किंवा मग गोर गरिब विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप असो विविध उपक्रमात आम्ही अग्रेसर असतो.
ऐन थंडीत,अवकाळी पावसात आपले घर दार सोडून शेकडो किलोमीटर अंतरावर परगावात येऊन जागा मिळेल त्या ठिकाणी राहणारे ऊस तोड मजूर यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प मुख्याध्यापिका मा.के. टी.बाबर(मॅडम) यांनी केला अन् आज तो प्रत्यक्षात आला.
आज सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता घोगाव -दुधोंडी रोड नाजिक वास्तव्यास असलेले जवळपास २०-२२ ऊसतोड मजूर कुटुंबांना विद्यार्थ्यांनी गोळा केलेला दिवाळी फराळ त्यांच्याच हस्ते वाटप केला. यावेळी त्या ऊसतोड महिला,पुरुष आणि लहान लेकरा बाळांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.कृतज्ञ मनाने त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचे आभार मानले.
शेतात त्यांची वस्ती असल्याने व मागील आठवड्यात मोठ्ठा पाऊस झाला असल्याने त्यांच्या खोपट्या खाली चिखल होता,आजू बाजूला पाण्याची डबकी साठली होती.त्यांची ही अवस्था पाहून आमचे विद्यार्थी भावूक झाले.आणि आपण खूप नशीबवान आहोत,आपण आता अजून नेटाने चांगला अभ्यास करून जीवनात यशस्वी झालेच पाहिजे अशी मनोकामना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
आज मा.मुख्याध्यापिका मा.बाबर के.टी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. आर.बी.शिंदे, श्री. डी.व्हीं.जाधव, श्री.पी.एम.पाटील, श्री.क्षीरसागर टी.एस., श्री.शिंदे पी.एच., श्री.माळी एस. व्ही.,कु.काटकर एस.आर., कु.पाटील एस. डी., सौ.शुभांगी मरळे हे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.आजच्या या सामाजिक उपक्रमाचे आमच्या संस्थेचे संथापक तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.महेंद्र (आप्पा) लाड यांनी कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या