महानंदा स्वामी 'आदर्श मुख्याध्यापिका' पुरस्काराने सन्मानित
झरे / प्रतिनिधी, श्री. प्रविण पारसे (सर)
झरे येथील भीमाशंकर स्वामी यांच्या स्नुषा सौ. महानंदा शीतल स्वामी यांना डी. एम. के. इंटरनॅशनल स्कूल कासारवाडी, पिंपरी-चिंचवड पुणे येथे 'आदर्श मुख्याध्यापिका' पुरस्कार देण्यात आला.
मुख्याध्यापक हा कोणत्याही शाळेचा मुख्य आधारस्तंभ असतो. आपली कौशल्ये पणास लावून शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचे महत्वपूर्ण काम मुख्याध्यापकांवर असते. ही जबाबदारी सौ. महानंदा स्वामी यांनी समर्थपणे पार पाडली, म्हणूनच हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
शाळेची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व समर्पन भावनेने पूर्ण केल्याची ही पोहोच पावती असल्याची भावना त्यांनी 'न्यूज प्रारंभ' शी बोलताना व्यक्त केली.
'आदर्श मुख्याध्यापिका' या पुरस्काराने त्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या. झरे व झरे परिसरात तसेच पुणे येथील परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या