झरे परिसरातील गुणवंत विद्यार्थींनींचा गुणगौरव संपन्न
झरे / प्रतिनिधी
झरे परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळविल्याबद्दल झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे अशा गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे प्राचार्य अशोक पडळकर यांची सुकन्या कु. स्वप्नाली अशोक पडळकर हिची STI पदी निवड झाल्याबद्दल तसेच झरे येथील क्रां. नागनाथ आण्णा नायकवडी कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यीनी कु. श्वेता आबासाहेब यादव हिने शिवाजी विद्यापीठात मराठी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल व कु. शुभांगी बाजीराव माने हिने तत्वज्ञान विषयात सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, सचिव भीमाशंकर स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आबासाहेब यादव, बाळू माने, संजय वगरे, दिपाली कारंडे, अमृता यादव, कविता यादव यांच्यासह मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. साहेबराव चवरे म्हणाले की, जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त केले जाऊ शकते. याचे ज्वलंत व मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या तीन विद्यार्थीनी आहेत. या विद्यार्थीनींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सुद्धा तुमचे व तुमच्या कुटुंबियांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कु. स्वप्नाली पडळकर, कु. श्वेता यादव व कु. शुभांगी माने या विद्यार्थीनींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
1टिप्पण्या