लेंगरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 लेंगरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 



लेंगरे/प्रतिनिधी 


खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील शेठ चतुरलाल गणपतचंद शहा विद्या मंदिर लेंगरेच्या 1995 - 96 च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला एकंदरीत 40 ते 50 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर प्रसंगी माजी शिक्षकांपैकी तत्कालीन प्राचार्य शिकलगार सर, माने सर, संस्थेचे आधारस्तंभ मोरे सर, सुभाष शिंदे सर, ज्युनिअर कॉलेजचे प्रयत्नवादी शिक्षक भीमाशंकर स्वामी सर इत्यादी मंडळी उपस्थित होते. 



शाळेच्या विद्यमान प्राचार्या सौ. खरात मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ देऊन त्या सांगलीहून लेंगरे येथे उपस्थित होत्या. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेसाठी मदत केली. विट्यातील महात्मा गांधी विद्यालयाचे माजी शिक्षक व सांगली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, हायस्कूलचे आधारस्तंभ तसेच माजी सरपंच जालिंदर बापू शिंदे यांनी या शाळेला वैभवाच्या शिखरावर आणण्याचे मोठे काम केले. 


श्रीरंग शेठ शिंदे, अशोक काका, सुखा तात्या, अशीफ भाई, पिसाळ तात्या, विलास तात्या, शिंदे सर, मोरे सर तसेच या शाळेचे प्रवर्तक कै. कुलकर्णी सर इत्यादींच्या तहयात कार्याचा श्री. भीमाशंकर स्वामी सरांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.


 विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आदर्श कसे रहावे, यासंदर्भात माने सर, शिकलगार सर व प्राचार्या खरात मॅडम यांनी अमूल्य ज्ञान दिले. यावेळी शुभांगी कदम, उषा भगत, वैभव कोल्हे, सिताराम गुजले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 


माजी विद्यार्थी हेमंत निंबाळकर देशमुख यांनी सदर कार्यक्रमासाठी फार मोठे योगदान दिले व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात श्री. भीमाशंकर स्वामी सर यांनी प्रा. साहेबराव चवरे सर यांचे विचार भाषणातून मांडले. 


सांगली शिक्षण संस्था व जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था या मित्र संस्था आहेत. या संस्थेचे स्वामी सर हे सचिव आहेत. तर चवरे सर हे संस्थापक अध्यक्ष आहेत. 


प्रा. चवरे सर व स्वामी सर यांनी सेवानिवृत्तीनंतर शिक्षणापासून वंचित व उपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून झरे येथे जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरे या संस्थेची स्थापना केली. यामुळे परिसरातील वाडी वस्त्यावरील अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*