कराडात क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यानींचा सत्कार
सातारा / प्रतिनिधी
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड चे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी कराड येथे झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे या प्रशालेतील कु. तनिषा मेटकरी, कु. अक्षदा दाजीराम पारेकर यांनी खो-खो या खेळामध्ये उल्लेखनीय यश मिळवले बद्दल तसेच कु. साक्षी विश्वास सुर्यवंशी व आप्पा रामचंद्र माळवे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या जवळपास तीनशे हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मा.डॉ. अशोक गुजर, संस्थापक/अध्यक्ष, डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज विद्यानगर, कराड यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिक्षण रत्न पुरस्कार,मा. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ आण्णासाहेब डांगे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, आण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाज रत्न पुरस्कार व मा. सचिन बुरुंगले चेअरमन, हर्ष लॉजिस्टिक्स कंपनी नवी मुंबई यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा. डॉ. इंद्रजीत यशवंतराव मोहिते, उपाध्यक्ष भारती विद्यापीठ पुणे व विश्वस्त वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट पुणे,श्री. उल्हास वाघमोडे भुमिअभिलेख अधिकारी मुंबई, मा.श्री. विश्वासराव संपतराव मोरे पाटील (दिलीप दादा) कृषी रत्न पुरस्कार विजेते, मा. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ आण्णासाहेब डांगे, जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, प्रा.श्री. रवींद्र कोकरे बारामती ग्रामीण कथाकार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे आदर्श शासन, लोकसेवा आणि नारी शक्तीचा तेजस्वी वारसा. त्यांचं नाव उच्चारलं की प्रजाहित, न्याय, दानशूरता व संस्कृती संवर्धन यांचे प्रतिक आठवते. या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने आम्ही आपल्या शैक्षणिक, वैद्यकीय, क्रिडा व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा म्हणजेच आपुलकीने केलेलं कौतुक. शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा एका नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरूवात. या प्रवासात तुम्ही, तुमच्या पालकांनी आणि शिक्षकांनी अभ्यासासाठी यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि यश संपादन केले. तुमच्या चशात आणि आनंदात आम्हाला सहभागी होता यावं याकरिता तुमचा सन्मान होणे तितकच महत्वाचा आहे. म्हणून आम्हाला तुमचा सन्मान करणे यथोचित वाटते, ज्ञान मिळवणे हे व्यक्तिमत्व घडवण्यात पहिलं पाऊल असतं आणि अरशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणं म्हणजे समाजाचा उज्वल भविष्यात हातभार लावणे. हे केवळ मूल्यमापनच नव्हे तर प्रेरणेच व्यासपीठ आहे आज गौरवीत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळयात चमक होती ती म्हणजे नव्या स्वप्नांची, मेहनतीची आणि आश्वासक भविष्याची म्हणून या कार्याचा सन्मान म्हणून आपणांस 'क्रिडा रत्न' पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. असा आशय प्रमाणपत्रात नमूद करण्यात आला आहे.







टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या