झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

न्यूज प्रारंभ
By -
0

 

झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

झरे/प्रतिनिधी

झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर यांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर व बिरू घोरपडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.




संत गाडगे महाराज  हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते. समाजसुधारक आणि 'डेबुजी' या नावाने ओळखले जाणारे लोकशिक्षक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा, स्वच्छता आणि अज्ञान निर्मूलनासाठी वेचले.


यावेळी बोलताना विद्यालयातील शिक्षक श्री. प्रविण पारसे सर म्हणाले की, गाडगेबाबांना 'स्वच्छतेचे प्रतीक' मानले जाते. ते जेव्हा एखाद्या गावात जात, तेव्हा सर्वात आधी हातात खराटा घेऊन तिथल्या गल्ल्या आणि रस्ते स्वतः झाडायला सुरुवात करत.​त्यांचा संदेश स्पष्ट होता: "शरीर आणि मन स्वच्छ हवे असेल, तर आपला परिसरही स्वच्छ हवा." ​त्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.


​ते पुढे बोलताना म्हणाले की, कीर्तनातून समाजप्रबोधन ​गाडगेबाबांची कीर्तने ही पारंपरिक नसून ती लोकशिक्षणाचे माध्यम होती. ते आपल्या कीर्तनातून ​अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि जातिभेदावर कडाडून टीका करत. ​नशापाणी आणि कर्जबाजारीपणापासून दूर राहण्याचे आवाहन करत. ​देवाला मूर्तीत शोधण्याऐवजी 'माणसातल्या देवाला' ओळखा, असे सांगत.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री. महेंद्र यादव सर यांनी केले तर आभार श्री. हिंदूराव वाघमोडे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*