पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

न्यूज प्रारंभ
By -
0

 पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न



         मदरसा हजरत अली बिन अबी तालिब(रजी) पलूस संस्थेचे डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस मध्ये मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा चा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किर्लोस्करवाडीचे प्रसिद्ध उद्योजक हाजी मुनीर भाई मगदूम हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पलूस मदरसा चे नाजीम मुफ्ती मीर रफतअली साहेब हे होते.यावेळी मंचावर किर्लोस्करवाडीचे प्रसिद्ध उद्योजक मुबारक इनामदार ,तासगावचे हाजी हाफिज अय्याज साहब,घोगाव हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक बशीर मुल्ला सर,तासगावचे फिरोज मणेर,हाजी महम्मद हनीफ शेख,पत्रकार इकबाल भाई मुल्ला,किर्लोस्करवाडीचे  मुज्जमील भाई,सतीश माने,विनायक लोहार कुंडल हे उपस्थित होते.




यावेळी  अध्यक्षीय भाषणाचे वेळी मुफ्ती रफत अली साहब यांनी विद्यार्थ्याना शालेय जीवनात खेळाचे महत्व सांगितले.तसेच शिस्तबद्ध खेळाचे आवाहन केले.तदनंतर सर्व उपस्थित मैदानावर जात काही सामन्यांचे प्रातिधिनिक उद्घाटन केले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यानी राष्ट्रगीताचे गायन केले व सामन्यांना सुरवात झाली.दरम्यान मुबारक भाई इनामदार यांनी मरहूम महेबूब भाई इनामदार यांचे स्मरणार्थ विद्यार्थ्याना लागणाऱ्या ट्रॉफी देण्याचे घोषित केले. 




यावेळी सर्व मदरसा उस्ताद व पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर आगा सर व खुदबुद्दीन मुजावर सर यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक आलीम शेख सर,क्रीडा शिक्षक बी.एम.नदाफ सर,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*