भिमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदीर प्रशालेतील आदर्श शिक्षिका 'भिमाई पुरस्काराने' सन्मानित.
प्रतिनिधी/सातारा
सातारा येथील भिमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदीर प्रशालेतील आदर्श शिक्षिका व शिक्षकांना 'भिमाई पुरस्काराने' गुरूवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयातील प्रा. ॲड. विजय वाघमारे व ज्योती वाघमारे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, झरेचे संस्थापक सचिव श्री.भीमाशंकर स्वामी व इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज साताराचे प्रा. डॉ. राजश्री जावळे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भीमाशंकर स्वामी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले. शेतकरी आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन झाली. यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाचा स्तर उंचावला आणि महाराष्ट्रात जागरूक नागरिक निर्माण झाला.
भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात एक वसतिगृह स्थापन केले होती ज्यासाठी त्यांंनी पत्नीचे मंगळसूत्र व दागिनेही विकले होते, त्यांंच्या पत्नीचा सुद्धा या कामात मोठा पाठिंंबा होता.त्यांंच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, पुणे विद्यापीठाने भाऊराव यांंना 1959 मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी बहाल केली होती. भाऊराव पाटील यांंना भारतीय सर्वोच्च पुरस्कारांंपैकी एक असा 'पद्मभूषण' हा पुरस्कार मिळाला आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सिद्धार्थ वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. प्रविण पारसे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार सौ. शेख मॅडम यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या