झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
झरे / प्रतिनिधी
झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 चा सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार दि. 20 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम परिसरात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. मार्गदर्शक विजय वगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्यावतीने, बाल चिमुकल्यांना आनंदीत करण्यासाठी व त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच सर्व मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी नृत्य प्रशिक्षक विजय वगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दि. 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 8 वा. प्रशालेच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष वाघमारे,भास्कर चौधरी व प्रविण पारसे यांनी या विभागाचे काम पाहिले.
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन नृत्य प्रशिक्षक विजय वगरे सर, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सुधीर बापू कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक विठ्ठल भाऊ धावडे पाटील, उद्योजक किरण भाऊ राजपूत, उद्योजक सचिन भाऊ इंगळे, उद्योजक महेश भोसकर साहेब अभियंता पुणे महानगरपालिका, जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, सचिव भीमाशंकर स्वामी सर, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सत्यजित चवरे साहेब, आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे, नितीन वाघमारे, झरे गावचे माजी सरपंच गजानन राजमाने, विद्यमान सदस्य सुरेश अर्जुन, प्रमोद राजमाने, झरे गावच्या पोलीस पाटील जाई गौरीहर लोहार तसेच सुरेश चवरे, अमोल शेठ जुगदर, रमेश माने, यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,अनेक पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पारसे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या