सात शिक्षक आमदारांवर शिक्षक आक्रमक

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 शिक्षक आमदारांनी मंत्रालयात खेटे घालावेत. संघटना रस्त्यावर आणि मंत्रालयात पाहिजे. सात शिक्षक आमदारांवर शिक्षक आक्रमक


शिक्षक आमदारांनी विनाकारण शिक्षकांचा पुळका येऊ देऊ नये. रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी शिक्षक समर्थ आहेत . तुम्ही मंत्रालय स्तरावरची लढाई लढा . तुम्ही सातच्या सात शिक्षक आमदार एकत्र या. आणि मंत्रालयाच्या समोर जीआर निघेपर्यंत धरणे आंदोलन करा. तर दोन दिवसात जीआर निघेल. मात्र विनाकारण राजकारण कराल तर गाठ राज्यातील 63 हजार शिक्षकांशी आहे हेही विसरू नका. अशी संतप्त भावना राज्यातील शिक्षकांमध्ये पसरली आहे.


 सात शिक्षक आमदार महोदयांनी 5 सप्टेंबर ला विधानभवनात ठिय्या करा

टप्पा वाढ जीआर निर्गमित करावा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्या समस्या, आमच्या अडचणी ,आमचे प्रश्न यासाठी आम्ही आपणास निवडून दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हजारो शिक्षक रस्त्यावर आहोत. अनेकांनी आत्महत्या केल्या. अनेकजण सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कुटूंबासाठी कोणीही वाली नाही. आज तुमची ताकद दाखवण्याची आवश्यकता आहे.


राज्यातील 63 हजार शिक्षक सरकारविरोधात पेटून उठले आहेत. आमदारांनी आता कोणतेही कारण सांगू नये. 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिन आमच्या सन्मानाचा आहे. शासनाने 5 तारखेच्या आत आमचा प्रश्न सोडवावा. अन्यथा आम्ही राज्यातील सर्व शिक्षक काळा शिक्षक दिन रस्त्यावर उतरून साजरा करू असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.


शिक्षक दिनी सर्व शिक्षक आमदार मुंबईत एकत्र यावे. आणि हा प्रश्न महत्वाचा असून त्या दिवशी आपण सर्वांनी विधानभवनात ठाण मांडून बसावे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणाहून उठू नये. आपले पूर्वनियोजित काही कार्यक्रम असतील तर त्याची कारणे आम्हाला सांगू नये अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोल्हापूर येथे आक्रोश गगनाला भिडला आहे. त्या ठिकाणच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत. सर्व संघटना पाठीशी राहून रास्ता रोको करणार आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*