विविध मैदानी स्पर्धेमध्ये झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचे प्राविण्य

न्यूज प्रारंभ
By -
0

 विविध मैदानी स्पर्धेमध्ये झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचे प्राविण्य


 विविध मैदानी स्पर्धेमध्ये झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने प्राविण्य मिळवले आहे. प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी झरे येथे झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात संपन्न झाला. 



 श्री भवानी विद्यालय आटपाडी या ठिकाणी पार पडलेल्या शालेय मैदानी स्पर्धेमध्ये झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे. आटपाडी तालुक्यांमध्ये या विद्यालयाने आपला दरारा कायम ठेवला आहे.  शाळेच्या नावाची चर्चा संपूर्ण तालुकाभर सुरू आहे. आर्यन बरकडे या विद्यार्थ्याने 400 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यार्थ्याची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे. 14 वर्षे वयोगट मुलींमध्ये मानसी चव्हाण हिने 200 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिची सुद्धा जिल्हा साठी निवड झाली आहे. श्रेया अमोल जुगदर या विद्यार्थिनीने 600 मीटर धावणे या प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.  17 वर्षे वयोगट मुली मयूरी गावडे या विद्यार्थिनीने  आठशे मीटर धावणे या प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.  तिची सुद्धा जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे. तसेच प्रतीक्षा पवार या विद्यार्थिनीने 800 मीटर धावणे यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. हिची सुद्धा जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे. तसेच श्रेया दादासाहेब जुगदर या विद्यार्थिनीने पंधराशे मीटर धावणे स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. तसेच 17 वर्षे मुलींनी रिले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या संघाची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे. यामध्ये अक्षदा पारेकर, साक्षी गावडे, श्रेया जुगदर, निशिगंधा वाघमारे, कल्याणी वगरे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता .


या सर्व खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, सचिव भीमाशंकर स्वामी सर,  मुख्याध्यापक श्री देवानंद घोणते सर, क्रीडा शिक्षक बिरू घोरपडे सर, महेंद्र यादव सर  व भास्कर चौधरी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*