चलो कोल्हापूर! चलो कोल्हापूर!! चलो कोल्हापूर!!
शाळा बंद! शाळा बंद!!
उद्या गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी उद्या कोल्हापुर येथे पुणे बेंगलोर महामार्ग अडवला जाणार आहे. जोपर्यंत टप्पा वाढीचा जीआर निर्गमित केला जात नाही. मागण्या मान्य होणार नाहीत. तोपर्यंत रस्ता रोको मागे घेतला जाणार नाही. अशी माहिती खंडेराव जगदाळे सर यांनी दिली आहे.
कोल्हापूर येथे अंशतः अनुदानित शिक्षकांचा आक्रोश गगनाला भिडला आहे. त्या ठिकाणच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत. सर्व संघटना पाठीशी राहून रास्ता रोको करणार आहेत.
राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व शाळा उद्या गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी बंद करून कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता हजर राहावे असे आवाहन माहिती महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी न्यूज प्रारंभला बोलताना केले आहे.
शिक्षक आमदारांनी मंत्रालयात खेटे घालावेत. संघटना रस्त्यावर आणि मंत्रालयात पाहिजे. सात शिक्षक आमदारांवर शिक्षक आक्रमक
शिक्षक आमदारांनी विनाकारण शिक्षकांचा पुळका येऊ देऊ नये. रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी शिक्षक समर्थ आहेत . तुम्ही मंत्रालय स्तरावरची लढाई लढा . तुम्ही सातच्या सात शिक्षक आमदार एकत्र या. आणि मंत्रालयाच्या समोर जीआर निघेपर्यंत धरणे आंदोलन करा. तर दोन दिवसात जीआर निघेल. मात्र विनाकारण राजकारण कराल तर गाठ राज्यातील 63 हजार शिक्षकांशी आहे हेही विसरू नका. अशी संतप्त भावना राज्यातील शिक्षकांमध्ये पसरली आहे.
सात शिक्षक आमदार महोदयांनी 5 सप्टेंबर ला विधानभवनात ठिय्या करा
टप्पा वाढ जीआर निर्गमित करावा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्या समस्या, आमच्या अडचणी ,आमचे प्रश्न यासाठी आम्ही आपणास निवडून दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हजारो शिक्षक रस्त्यावर आहोत. अनेकांनी आत्महत्या केल्या. अनेकजण सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कुटूंबासाठी कोणीही वाली नाही. आज तुमची ताकद दाखवण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील 63 हजार शिक्षक सरकारविरोधात पेटून उठले आहेत. आमदारांनी आता कोणतेही कारण सांगू नये. 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिन आमच्या सन्मानाचा आहे. शासनाने 5 तारखेच्या आत आमचा प्रश्न सोडवावा. अन्यथा आम्ही राज्यातील सर्व शिक्षक काळा शिक्षक दिन रस्त्यावर उतरून साजरा करू असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.
शिक्षक दिनी सर्व शिक्षक आमदार मुंबईत एकत्र यावे. आणि हा प्रश्न महत्वाचा असून त्या दिवशी आपण सर्वांनी विधानभवनात ठाण मांडून बसावे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणाहून उठू नये. आपले पूर्वनियोजित काही कार्यक्रम असतील तर त्याची कारणे आम्हाला सांगू नये अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोल्हापूर येथे आक्रोश गगनाला भिडला आहे. त्या ठिकाणच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत. सर्व संघटना पाठीशी राहून रास्ता रोको करणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या