घोषणांनी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय अक्षरशः दणाणून गेले.

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 उपचार घ्या उपचार घ्या जगदाळे सर उपचार घ्या.  यासह अनेक घोषणांनी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय अक्षरशः दणाणून गेले.




 आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाचा 34 वा दिवस व उपोषणाचा आजचा आठवा दिवस होता. उपचार घ्या उपचार घ्या जगदाळे सर उपचार घ्या.  यासह अनेक घोषणांनी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय अक्षरशः दणाणून गेले होते. आज आठव्या दिवशी पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील शेकडो शिक्षक कोल्हापूर येथे उपसंचालक कार्यालयासमोर उपस्थित होते.


गेली अनेक दिवस कोल्हापुरात शांततेत सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे. काल रविवारी शिक्षणमंत्री आणि आज सोमवारी मुख्यमंत्री यांचे दौरे अचानक रद्द झाल्याने शिक्षकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून जगदाळे सर यांची अवस्था दर तासाला गंभीर होत आहे.


५ सप्टेंबर २०२४ चे आत आमचा निर्णय लागल्यास कोल्हापूर विभगातील सर्व शाळांतील शेकडो शिक्षक/शिक्षिका/शिक्षकेत्तर कर्मचारी हे "शिक्षक दिनी"  पुणे-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग अडवणार आहोत.


  आज सकाळी दहा वाजता आरोग्य विभागाने तपासणी केली असता त्यांचे हातपाय पूर्णपणे थरथरत होते. अशावेळी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली असता त्यांनी ठामपणे नकार दिला . अजूनही जगदाळे सर उपोषण मागे न घेण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कॅबिनेट बैठक घेऊन टपावाढीचा शासनादेश निर्गमित करावा व राज्यातील  63 हजार शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी उपस्थित शिक्षकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*