झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात निर्भया पथकामार्फत लाठी काठीचे वाटप
झरे/प्रतिनिधी
आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालय या प्रशालेत निर्भया पथक विटा यांच्या मार्फत लाठी काठीचे वाटप करण्यात आले. मुलींच्या छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
मुलींचे संभाव्य धोके टाळण्यासाठी व कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 10-10 विद्यार्थी व विद्यार्थीनींचे रुट ग्रुप तयार करण्यात आले व समुहाने जाण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यात एक गट प्रमुख नेमून त्याच्याकडे एक काठी देण्यात आली. एकीचे बळ काय असते व त्याचे महत्व यातून विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
यावेळी पथक प्रमुख उदय साळुंखे व त्यांचे सहकारी सुजित देवराय आणि भारती भाट यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना 'स्वसुरक्षा' व लाठी काठीचा वापर कधी व कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
गट तयार करून लाठी वाटप करण्याचा हा आगळावेगळा पहिलाच प्रयोग असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. झरे पंचक्रोशी जनता विद्यालय ही शाळा नेहमीच पोलीस प्रशासनाला खूप सहकार्य करत आली आहे असेही गौरवोद्गार यावेळी बोलताना काढले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला पालक सौ. अश्विनी दाजीराम पारेकर तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या