झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी
झरे /प्रतिनिधी
आज मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच 'हर घर तिरंगा' या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थी समर्थ नंदकुमार जाधव व विद्यार्थीनी रोशनी लक्ष्मण बरकडे यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी सासरे मल्हाराव होळकरांचा मृत्यू झाला. त्यानंतर एकाच वर्षांनी राज्यकारभार पाहणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा देखील मृत्यू त्यांना पाहावा लागला. मुलाच्या मृत्यूपश्च्यात अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या.
अहिल्याबाईनी आपल्या इंदूर संस्थानातील प्रजेसाठी अनेक हितकारक निर्णय घेतले. रस्ते बांधले, धरणे बांधली, विहिरी खोदल्या. शेतकरी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन अनेक कामे केली. मात्र त्या बरोबरच त्यांनी आपल्या राज्याबाहेर देखील अनेक कार्य केले. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवींनी घातली .
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पारसे सर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या