अर्थमंत्री अजित पवारांना अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ द्यायला हवी , हा विषय माहित आहे मग ते सुडबुद्धीनं का वागतात? राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचा संतप्त सवाल

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 अर्थमंत्री अजित पवारांना अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ द्यायला हवी , हा विषय माहित आहे मग ते सुडबुद्धीनं का वागतात? राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचा संतप्त सवाल 




महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे निवेदन देण्यात आले.


आज आंदोलनाचा अकरावा दिवस असून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढीचा जीआर निर्गमित करावा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. 


शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 12 जुलै 2024 रोजी एक जून 2024 पासून वाढीव टप्पा देण्याबाबत घोषणा केली. परंतु घोषणा केल्याप्रमाणे अद्यापही जीआर निघालेला नाही.  जीआर तात्काळ निर्गमित करावा यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आपण यामध्ये लक्ष घालावे व येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेण्यात यावा ही विनंती केली.


जर घोषणा केली असेल तर जीआर काढण्यास एवढा विलंब का अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की  हे मला माहीत असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. "  असे सांगितले.


यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ , माजी मंत्री व आ. राजेंद्र पाटील यड्रावकर , आ. राजेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये विनायक सपाटे,  शिवाजी घाडगे, अभिजीत आपटे, सचिन मरळीकर, भानुदास गाडे, सावता माळी, अभिजीत कोतेकर, विजयसिंह जगदाळे, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, हेमा पोळ, सचिन पाटील, विष्णू जगताप, रवी कांबळे, श्रीकांत शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


दरम्यान अंशतः अनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती आहे तर मग फाईलमध्ये त्रुटी का दाखवत आहात. विषय माहितच आहे तर मग तो मार्गी का लावत नाही? तुम्ही एवढं सुडबुद्धीनं का वागत आहात असा संतप्त सवाल राज्यातील काही शिक्षकांनी केला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*