झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लो. टिळक यांची पुण्यतिथी साजरी

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लो. टिळक यांची पुण्यतिथी साजरी

झरे / प्रतिनिधी 


आटपाडी : झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लो. टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर व ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी बोलताना सचिव भीमाशंकर स्वामी सर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. मातंग समाजातील एका कुटुंबात त्यांचा जन्म झाल्याने लहानपणापासूनच अण्णाभाऊंच्या वाट्याला हलाखीचं जगणं आल होतं. अण्णाभाऊ साठे कधीच शाळेत गेले नाहीत. मात्र, त्यांनी कुशाग्र अक्षर ज्ञान प्राप्त केले.

 अण्णाभाऊंनी मराठीत 35 कांदबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईमध्ये अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे. त्यांनी जवळपास 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. तसेच मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णने, कथा, कविता, गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या मैना गावाकडे राहिली आणि मुंबईची लावणी या लावण्या गाजल्या .


यावेळी विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच विद्यालयातील शिक्षक प्रविण पारसे सर व संतोष वाघमारे सर यांचीही भाषणे झाली.


या कार्यक्रमाचे नियोजन इ. 9 वी च्या विद्यार्थ्यांनींनी केले होते. सुत्रसंचालन श्रेया चवरे हिने केले तर आभार स्वार्तिका पवार हिने व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*