झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे या प्रशालेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा
__________________________________
झरे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै, 2024 शिक्षण सप्ताह साजरा करण्याच्या अनुषंगाने प्रशालेत आज रविवार दि. 28 रोजी सामुदायिक सहभाग, प्रभात फेरी, घोषवाक्य, स्नेह भोजनाचे आयोजन आदी कार्यक्रम साजरे करण्यात आले.
गेली आठवडाभर हे कार्यक्रम सुरू होते. यामध्ये भिंती पत्रके, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, हस्तलिखित प्रदर्शन, प्लॅश बोर्ड, प्रतिकृती, तरंग चित्र, बाहुल्या, गणितीय कल्पना,परिपाठ व प्रतिज्ञा , गणित तज्ञांची माहिती, गणितीय कथाकथन, कोडी व खेळ, क्रीडा, परिपाठ, क्रीडा शपथ, देशी खेळाचे महत्व, खेळ व व्यायाम,पारंपारिक वेशभूषा, लावणी नृत्य, पथनाट्य, कथाकथन, कोळी नृत्य, गायन आणि एकांकिका, माती काम, बांबू कला कार्यशाळा, मुखवटा, कापडी पिशवी, प्रथमोपचार कार्यशाळा, इको क्लब ची स्थापना, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासाठी नावांचे फलक, शालेय पोषण आहार व त्यातून मिळणारा उष्मांक इ. उपक्रमांनी भरलेला हा आठवडा संपन्न झाला .
मा. सचिव, भारत सरकार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्या पत्राच्या अनुषंगाने जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे झरे पंचक्रोशी जनता विद्यालय या प्रशालेत शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. देवानंद घोणते सर यांनी केले होते.
आजच्या दिवशी शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, यांच्या विद्यांजली पोर्टल मधील शालेय शिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसमवेत प्रभात फेरी काढणे, घोषवाक्य देऊन जनजागृती करणे, स्नेह भोजनाचे आयोजन, सामुदायिक सहभाग आदी उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. याबद्दल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, व सचिव भीमाशंकर स्वामी सर व सर्व संचालक यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या