झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
झरे/प्रतिनिधी
जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे झरे पंचक्रोशी जनता विद्यालयामध्ये आज 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली.
आज काढलेल्या प्रभात फेरीमध्ये खास आकर्षण म्हणजे लेझीम नृत्य होते. त्याचबरोबर तिरंग्यातील मुली, तालबद्ध वाद्यवृंद, जवानाच्या गणवेशामध्ये फौजी तसेच शिक्षकांची शिस्त या बाबी प्रकर्षाने लक्ष वेधून घेत होत्या. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला होता. विशेष बाब म्हणजे मारुती मंदिर व आंबेडकर भवन येथील लेझीम नृत्याने ग्रामस्थांची अक्षरशः मने जिंकून घेतली. रंगबेरंगी साड्या व फेटे हे खूप मोहनीय होते.
दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी व अष्टपैलू कलाकार अलंकार विजय केंगार याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी 'संदेशे आते है' हे देशभक्तीपर गीत सादर केले. तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनींनी 'ए वतन वतन मेरे आबाद रहे तू' हे देशभक्तीपर गीत सादर केले.
यानंतर शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला शुभम बाळासाहेब वाघमोडे, द्वितीय क्रमांक प्रथमेश रमेश सादिगले, तृतीय क्रमांक अनिकेत गजानन जावीर या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
तर मराठी विषयामध्ये शंभर पैकी 97 गुण मिळवत सिद्धी सदाशिव पवार या विद्यार्थिनीने प्राविण्य मिळवले होते. कै.विलास महादेव वाघमारे यांच्या स्मरणार्थ विद्यालयातील मराठी शिक्षक श्री. संतोष वाघमारे यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस देण्यात आलं. तर भूगोल विषयांमध्ये 40 पैकी 40 गूण मिळवलेला प्रथमेश रमेश सादिगले यालाही पारितोषिक देण्यात आले.
यावेळी आटपाडी तालुका आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे बोलताना म्हणाले की, भाषण केलेल्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद भाषण केले आहे. शाळेचा गुणवत्तेचा चढता आलेख असाच रहावा.शाळेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो अशा शुभेच्छा देऊन त्यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा इतिहास सांगितला. त्याचबरोबर आणि इतर क्रांतिकारकांचा इतिहास त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून व्यक्त केला. यावेळी गेल्या वर्षी दहावीच्या प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांने 94.40 % इतके गुण मिळवले होते. चालू शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या परीक्षेत यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आईवडीलांच्या स्मरणार्थ 2222 रुपये इतके बक्षीस देण्यात येईल, अशी त्यांनी यावेळी जाहीर केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रथम अभिनंदन करतो. शाळेने सलग 16 वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. त्याबद्दल सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, इंग्रज राजवट फार जुलमी होती. या जुलमी राजवटीला उलथून लावण्यासाठी या देशातील अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. पश्चिम महाराष्ट्रात क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील. या क्रांतिकारकांचा खऱ्या अर्थाने गौरव करावा तेवढा कमीच आहे असे गौरवोद्गार काढले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवावे. याच विद्यालयातील आप्पा माळवे या विद्यार्थ्याने 99.60% इतके गुण मिळवले होते. त्याचे रेकॉर्ड मोडणाऱ्या विद्यार्थ्याला भरघोस बक्षीस देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजात जन्माला येऊन सुद्धा मोठ मोठ्या पदव्या घेऊन संविधान लिहिले. त्यांनी सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे . आज देशामध्ये धर्मांध शक्ती सध्या राजसत्तेमध्ये आहेत. त्यामुळे जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे. शेवटी बोलताना ते म्हणाले की, या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. 'हा चंद्र सुर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे' या काव्यपंक्ती म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख संतोष वाघमारे सर यांनी केले तर आभार प्रविण पारसे सर यांनी मांडले. यावेळी संस्थेतील काही हितचिंतकांनी व ग्रामस्थांनी तसेच आजी माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ दिले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब,संचालक रमेश खोत झरेचमा माजी उपसरपंच गजानन राजमाने, औदुंबर यादव, कांतेश्वर माने, पांडूरंग अर्जुन,सुरेश चवरे,बाबासो वाघमारे, कोरे मिस्त्री, नवनाथ वगरे , सौ. घोणते मॅडम मुख्याध्यापक देवानंद घोणते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आटपाडी तालुका आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे, महादेव खंदारे, शंकर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य बाळू माने, सचिन पाटील, माजी विद्यार्थी स्वप्निल पाटील, जीवन पाटील, रामचंद्र पाटील, बाबा जावीर, दिलीप वाघमारे, विठ्ठल घोरपडे, बंडोपंत यादव, प्रकाश घोणते, ह. भ. प. अर्जुन महाराज, प्रशांत लोहार गजानन जावीर , बाळासाहेब वाघमोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या