टप्पा वाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरात घेतली भेट

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

  टप्पा वाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरात घेतली भेट

न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया 


1 जानेवारी 2024 पासूनच टप्पा वाढ मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिक्षक समन्वय संघाच्या वतीने कोल्हापूर येथे शिष्टमंडळाने भेट घेतली 

कोल्हापूर येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे महाअधिवेशन दि. 16 व 17 फेब्रुवारी रोजी असल्याने राज्यातील शिंदे गटाचे सर्व मंत्री व अनेक आमदार कोल्हापूर येथे दाखल झालेले आहेत.

काल शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह या ठिकाणी भेट घेतली. त्यावेळी त्यांना राज्यातील 63 हजार शिक्षकांची हेळसांड होत आहे . या शिक्षकांना टप्पा वाढ देऊन ही हेळसांड तात्काळ थांबवावी . 1 जानेवारी 2024 पासूनच टप्पा वाढ द्यावा अशी मागणी केली .यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणताही विलंब न लावता सांगितले की, आपल्या टप्पा वाढीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच यावर  निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले .

राज्यातील 63 हजार शिक्षकांच्या वेतनाची जाणीव असलेले व त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनीही सांगितले की हा खूप दिवसांचा प्रश्न प्रलंबित आहे. यावर तातडीने मार्ग काढावा, अशी त्यांनी विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी परत सांगितले की, यावर मार्ग काढतोय. लवकरच निर्णय घेऊ. त्यामुळे राज्यातील 63 हजार शिक्षकांसाठी ही महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे.

यावेळी शिष्टमंडळात भानुदास गाडे, केदारी मगदूम, जयदीप चव्हाण, सावंता माळी, उत्तम जाधव, सचिन मरळीकर,भोगम सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*