Earthquake : जत तालुक्यातील उमदी, उटगी, माडग्याळ परिसरात भूकंप सदृश्य सौम्य धक्का
न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया
जत तालुक्यातील उमदी व उटगी माडग्याळ परिसरात मंगळवारी दुपारी एक वाजून 52 मिनिटांनी काही भागात भूकंप सदृश्य सौम्य धक्का जाणवला.
उमदी - जत तालुक्यातील उमदी व उटगी माडग्याळ परिसरात मंगळवारी दुपारी एक वाजून 52 मिनिटांनी काही भागात भूकंप सदृश्य सौम्य धक्का जाणवला. सौम्य धक्का बरोबरच मोठा आवाज झाला.
आवाज इतका मोठा होता की किमान 20 ते 30 किलोमीटर आवाज घुमघुमला दुपारची वेळ असल्याने व शांतता असल्याने झालेल्या आवाज प्रकाशाने जाणवला भुगर्भातून आवाज येताच लोक घरातून बाहेर पळाले. व मंगळवारी उटगी येथील बाजार असल्याने एकाच पळापळ उडाली. पूर्व भागातील अनेक गावात हा आवाज मोठा आल्याने काय काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
भूकंपाचा धक्का जाणवतात भूकंपाचा सौम्य धक्का असल्याने घाबरण्याचे कारण नाही. लोकांनी गोंधळून जाऊ नये असे आव्हान याबाबत प्रशासनाने केले आहे. मंगळवारी वातावरणात दोन ते तीन अंश 38 तापमानात वाढ झाली झाल्याने हे धक्के जाणवत असल्याचे विज्ञानाचा अभ्यासकांचे मत आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू उटगी परिसरात असल्याचे मत व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या