झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्यावतीने चेतन मानेंचा सत्कार संपन्न

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्यावतीने चेतन मानेंचा सत्कार संपन्न

झरे / प्रतिनिधी

झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत झरे (मानेवाडी) ता. आटपाडी जि .सांगली येथील चेतन पांडुरंग माने या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे . त्यांची वनविभागातील वनलेखापाल पदी निवड झाल्याबद्दल जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर यांच्या हस्ते त्यांच्या आई वडिलांसमवेत सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना प्रा .साहेबराव चवरे सर म्हणाले की , एका माथाडी कामगाराच्या मुलाने हे घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना अशा गुणवंतांकडून प्रेरणा मिळावी या उद्देशाने असा सन्मान सोहळा आयोजित केला जातो . मानेवाडी ही डोंगराच्या पायथ्याशी वसलेली छोटी वाडी आहे . अशा वाडीवरील मुलाने दैदीप्यमान यश संपादन केले आहे . त्याबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन केले. यापुढे सुद्धा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे . आमच्या संस्थेच्या प्रघाताप्रमाणे आम्ही असे सत्कार आयोजित करत असतो . 

सत्काराला उत्तर देताना चेतन माने म्हणाले की, माझे संपूर्ण शिक्षण नवी मुंबईतील सुधागड एज्युकेशन सोसायटी येथे झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी पहिल्या रँकमध्ये होतो. त्यामुळे माझा नंबर लागेल याची मला खात्री होती. स्पर्धा परीक्षेत पहिली ते दहावीचाच शालेय अभ्यासक्रम असतो. जिद्द,चिकाटी व समर्पण वृत्तीने अभ्यास केला तर यश निश्चित मिळेल .

 पुढे बोलताना माने म्हणाले की, ग्रामीण भागातील मुले झेंडूच्या फुलासारखी असतात तर शहरी भागातील मुले गुलाबाच्या फुलासारखी असतात. माझा माझ्या आईवडिलांसोबत सत्कार केला त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी चेतन मानेंचे आईवडील, संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संतोष वाघमारे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*